गुरुवार, ७ मार्च, २०१९

महिला दिन विशेष


मला व्हायचंय स्त्री
जगायचंय ह्या पुरुषप्रधान संस्कृतीत,
या संस्कृतीत तिच्यावर वेळोवेळी होणारे
अत्याचार अनुभवायचे आहेत


मला व्हायचंय स्त्री
अनुभवायचा आहे मासिक पाळीत होणारा त्रास,
दुनियेच्या खोचक कमेंट सहन करत
अंग चोरून चालणारी
ती स्त्री व्हायचंय...
अनुभवायचं आहे मला
तिच्या मनावर होणाऱ्या त्या वेदना,
त्या वेदना सहन करत
या समाजात जीवन जगणारी
ती स्त्री अनुभवायची आहे...


मला व्हायचंय ती स्त्री
जिच्यावर होणारे दुनियेचे जीवघेणे इशारे
चहुबाजूंनी वखवखलेली नजर
आणि तिचे लचके तोडण्यास सरसावलेले
ते मर्दांकीचे हात
ह्यातून बचाव व्हावा म्हणून
अंग चोरून चालणारी ती,
त्यावेळी तिच्या मनावर होणाऱ्या
आघातांना जाणून घ्यायचं आहे...


मला व्हायचंय ती बलात्कारीक स्त्री
जाणून घ्यायच्या आहेत,
त्या बलात्कारीक यातना,
तिच्यावर समाजातून होणाऱ्या
खोचक टीका, त्या नजरा
त्यावेळी तिच्या मनाला होणाऱ्या वेदना
जाणून घ्यायच्या आहेत...


मला व्हायचंय ती स्त्री
जिच्यावर गल्लोगल्ली असलेली
वासनाधारी नजर
या नजरेतून बचाव व्हावा म्हणून
घराबाहेर न पडणारी ती
तिच्या मनात स्वातंत्र्यावरून
होणाऱ्या विचारांचा उद्रेक
जाणून घ्यायचं आहे...


मला व्हायचंय ती विधवा स्त्री
जाणून घ्यायच्या आहेत
तिच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या,
त्या जबाबदाऱ्या पार पाडताना
होणारे हाल, तिचे कष्ट
जाणून घ्यायचे आहेत...
हे सर्व करताना
तिच्यावर असलेल्या विखारी नजरा झुगारून
लढणारी ती विधवा स्त्री व्हायचं आहे...


मला व्हायचंय ती स्त्री
या पुरुष प्रधान संस्कृतीच्या
उरावर बसून
जोमाने प्रगती करणारी,
या संस्कृतीचे लचके तोडणारी
ती स्त्री व्हायचंय...
- गिरीश अमिता भाऊ कांबळे
             (पोंभुर्ले)
      ०८/०३/२०१९
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!💐💐




पत्रकार बाबासाहेब आंबेडकर...!

२० व्या शतकाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यलढ्यासोबतच महाराष्ट्र सामाजिक न्यायाच्या चळवळीनं ढवळून निघत होता. अनेक वर्तमानपत्र, मासिकं, पु...