गुरुवार, ८ मार्च, २०१८

महिला दिन विशेष


८ मार्च,जागतिक महिला दिनानिमित्त लिहिताना आनंद व्यक्त करावा कि खंत,याच संभ्रमात आहे.कालपर्यंत पुरुष प्रधान संस्कृती असलेला देश आज अचानक महिलांचे गुण गातोय.आज महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.काल पर्यंत शून्य किंमत देणाऱ्या महिलांना आज आदर देत आहेत.यावर आनंद व्यक्त करू कि खंत ह्याच विचारात आहे.कालपर्यंत तिच्या चारित्र्यावर संशय घेणारे,बिनधास्तपणे बलात्काराच्या धमक्या देणारे,तिला नाव ठेवणारे,तिच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आज नारी शक्तीचा उदोउदो करताहेत.याचा आनंद व्यक्त करू कि खंत.
आपल्या देशात स्त्रियांना आदर,स्वातंत्र्य,समानता आहे अस बोलणार्यांना मी शेण खा अस सरळ सांगेन.मुळात तिच्या वाट्याला आलेले अर्धे आभाळ अजूनही काळवंडलेलच आहे.हे मळभ हटवण्यासाठी तिचा निकाराचा लढा सुरूच आहे.अनेक क्षेत्रात तळपती समशेर बनुन ती आपल्या शत्रुंशी लढत आहे.हे शत्रु किती आहेत याची मोजणी करणे सोप्पे आहे पण ते कोण आहेत हे ओळखणं अवघड आहे.ती तिच्या शत्रुंसोबत लढतेय म्हणून आनंद व्यक्त करू कि तिचे शत्रु कोण आहेत हे ओळखता येत नाही म्हणून खंत व्यक्त करू. 
आज तिला बिनधास्त बोलता येत नाही आहे ना मुक्तपणे हिंडता येत आहे.अजूनही तिला वासनाधारी नजरेतून स्वतःला जपत जाव लागतय.नाक्यानाक्यावर,गल्लोगल्ली मध्ये तिच्यावर असलेली वासनाधारी नजर कमी झालेली नाही आहे.या सगळ्यातुन स्वतःला वाचवण्यासाठी बहुधा ती घराच्या बाहेर पडत नसावी.स्वतःच्या हव्यासासाठी,स्वतःची कामवासना पूर्ण करण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती करताहेत.आणि जर तिने विरोध केला तर हौड्रोजनयुक्त असा भाजून भोके पाडणारा पदार्थ तिच्या निरागस,सुंदर चेहऱ्यावर,शरीरावर टाकण्याचं किळसवान,निर्लज्जपणाचं कृत्य करताहेत.तोच पदार्थ त्यांच्या शीष्णावर ओतावासा वाटतोय.मग समजेल तुम्हाला वेदनांचा अर्थ अन संपेल तुमची वासनेची इच्छा.
    महिला दिनाच्या शुभेच्छा देण्याआधी चौकाचौकात,गल्लोगल्ली असलेली वासनाधारी नजर कमी करा.करा बंद तिच्या चारित्र्यावर संशय घेणं.द्या त्यांनाही त्यांचं स्वातंत्र्य.हिंदूडे त्यांनाही मुक्तपणे.नसाव्यात तिच्यावर कोणत्याही मर्यादा.मग खुशाल द्या शुभेच्छा.

               
                                              - गिरीश अमिता भाऊ कांबळे 
                                                          ०८/०२/२०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पत्रकार बाबासाहेब आंबेडकर...!

२० व्या शतकाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यलढ्यासोबतच महाराष्ट्र सामाजिक न्यायाच्या चळवळीनं ढवळून निघत होता. अनेक वर्तमानपत्र, मासिकं, पु...